नेटकरी म्हणतात सीतेच्या भूमिकेसाठी करीना नको हिंदू अभिनेत्री हवी
सध्या सोशल मिडियावर बायकॉट करिना हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. याचे कारण आहे रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करीना कपूरला झालेली विचारणा. या भूमिकेसाठी करिनानं तब्बल 12 कोटी रुपये मागितल्याची चर्चा आहे. सुरुवातीला याच भूमिकेसाठी करिनानं 10 कोटी रुपये मानधन मागितले होते. मात्र आता करिनाने आणखी दोन कोटी वाढवून 12 कोटी रुपयांची मागणी केली आहे. करिनाने जास्त पैशांची मागणी केल्यामुळे रामायण चित्रपट लांबणीवर गेलाय त्यामुळे आता नेटकरी संतापलेले आहेत. त्याचप्रमाणे सीतेच्या भूमिकेसाठी करिना ऐवजी हिंदू अभिनेत्री घ्या, असा आग्रहदेखील नेटकऱ्यांचा आहे. याशिवाय करिना ही दोन मुलांची आई आहे, तिला या चित्रपटात सितेची भूमिका कशी मिळू शकते? असा सवाल संतप्त नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
रामायण हा चित्रपट बिग बजेट चित्रपट आहे. अलौकिक देसाई हे त्याचे दिग्दर्शक असणार असून बाहुबली या मल्टी स्टारर चित्रपटाचे लेखक के. विजयप्रसाद हे या चित्रपटाचे लेखक आहेत. दरम्यान, के. विजयप्रसाद यांनी ‘स्पॉटबॉय’शी बोलताना या वृत्ताचे खंडन केले आहे. तसेच करीना सीतेची भूमिका करणार नसून कोणीतरी प्रसिद्धीसाठी हा प्रकार केला असावा, असे म्हटले आहे.
