Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

कोरोनामुळे पालकांचे छत्र गमावलेल्या गरीब मुलांना ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट करणार तातडीची आर्थिक मदत

पुणे – अठरा वर्षाखालील ज्या मुलांच्या पालकांचे (एक किंवा दोन्ही) कोरोनामुळे निधन झाले आहे अशा पुणे मनपा हद्दीतील गरीब मुलांना ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट तातडीची आर्थिक मदत करणार आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना टीबीएल कन्सल्टन्सीची असून ट्रस्ट तर्फे सेव्ह द चिल्ड्रन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून अशा मुलांना दरमहा रुपये २००० प्रमाणे  पुढील सहा महिने आर्थिक मदत करण्यात येईल अशी माहिती ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे विश्वस्त  रतन राठी यांनी दिली.

कठीण काळात सावरण्यासाठी त्यांना मदत व्हावी हा या मागचा हेतू असून मुले वयाने अतिशय लहान असतील तर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना वर नमूद केलेली आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.

सुरुवातीला सेव्ह द चिल्ड्रन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून सदर उपक्रमाची सुरुवात ४५ मुलांना आर्थिक मदत करून होणार आहे. कोरोनामुळे मातृ-पितृ छत्र गमावलेल्या गरीब मुलांच्या नातेवाईकांनी या उपक्रमाअंतर्गत मदतीची आवश्यकता असल्यास ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टशी ८७६७६७५५५३ अथवा सेव्ह द चिल्ड्रन इंडिया या संस्थेशी ८३०८९९२२२२ या दूरध्वनी  क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन राठी यांनी केले.

ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट गेली कित्येक दशके विविध सामाजिक उपक्रम राबवीत असून त्यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, शहरांचा शाश्वत विकास, मुल्याधारित भारतीय परंपरांचे जतन, संयम व्यसनमुक्ती विषयक जागरूकता उपक्रम, शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading