कोरोना – पुणे शहरात आज 459 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे :शहरामध्ये पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याची संख्या अधिक आहे.

पुणे शहरामध्ये गेल्या चोवीस तासात 331 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे 459 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे पुणे शहरात आज पर्यंत चार लाख 73 हजार 870 इतके कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहे .त्यापैकी 4लाख 62 हजार 222 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या चोवीस तासात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 10 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8466 जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5829 तपासणी करण्यात आली आहे आतापर्यंत पुण्यामध्ये 25 लाख 73 हजार 241 प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यात आले आहेत. शहरात सध्या 571 रुग्ण गंभीर आहेत तर 802 रुग्ण व ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: