रविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजर चेअरपर्सन

पुणे : लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४ डी चे रीजन चेअरपर्सन रविंद्र गोलर यांनी सर्वोत्कृष्ट रीजन चेअरपर्सन हा किताब पटकाविला. संपूर्ण महाराष्ट्रातून ही निवड करण्यात आली. नेतृत्व आणि सेवाकार्यातील कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.

गिरीश मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मल्टीपल कौन्सिल ३२३४ च्या वार्षिक परिषदेत ही निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून ३५ रीजन चेअर पर्सन या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून रविंद्र गोलर यांची सर्वोत्कृष्ट रीजन चेअरपर्सन म्हणून निवड करण्यात आली. गोलर हे पुण्यातील २९ लायन्स क्लबचे नेतृत्व करतात.

रविंद्र गोलर हे लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. लायन्स क्लबच्या वतीने राबविण्यात आलेल्या ऑक्सीजन बॅंक प्रकल्पात त्यांनी काम केले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, कॅन्सर रुग्णांना निधी उपलब्ध करुन देणे. ऑक्टोबर सेवा सप्ताहात रिक्षा चालकांना संरक्षक पडदे देणे, मास्क वाटप, चष्मे वाटप, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप असे विविध सेवाकार्य त्यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: