लष्कर पोलीसांतर्फे कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना अन्नधान्य कीटचे वाटप

पुणे – लष्कर पोलीस ठाण्यातर्फे मुलाणी आय केअर सेंटरच्या सहकार्याने लष्कर भागात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना विशेष पोलीस अधिकारी(SPO) यांच्या माध्यमातून घरपोच अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले.
ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनामुळे दगावले आहेत अशा कुटुंबांना मदतीचा हात देता यावा या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केले.घरपोच अन्नधान्य कीट मिळाल्याबद्दल अनेक कुटुंबांनी लष्कर पोलिसांचे कौतुक करून आभार मानले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: