भोर तालुक्यातील शेतकऱ्यांवर तुळशीबाग व्यापाऱ्यांची मायेची छत्री

पुणे – मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने सगळीकडे हिरवं गार,निसर्ग रम्य भोर परिसरात शेतकरी वर्गाची लावणीची लगबग सुरु झालेली…..भुईमूग शेंगा काढून आता भात लावणी साठी खाचरं तयार करायची सुरुवात या परिसरात सुरु झाली. मुबलक निसर्गाने संपन्न असा हा परिसर……..लाॅकडाऊनमुळे खूप घटकांची आर्थिक स्थिती खालावली आहे..ह्यात ग्रामीण भागातील रोजंदारी करणारा वर्ग पण अपवाद नाही…….सुदैवाने या वर्षी समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे…अशा वेळी शेतात रोजंदारी वर काम करणारे यांना पण रोजगार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे…..अशा परिस्थितीत शेतात रोजंदारी वर काम करणारे भोर तालुक्यातील पसूरे, राजघर, वेळवंड,आणि पांगारी या गावातील
100 लोकांना रेनकोट व गमबूट तुळशीबाग व्यापारी असोसिएशन च्या वतीने देण्यात आले..
येणाऱ्या पावसात ही लोक भाताची लागवड करतात अशावेळी त्यांना रेनसूट व गमबूटाची आवश्यकता भासते तीच गरज ओळखून तुळशीबाग व्यापारी असोसिएशन च्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गावातील सरपंच यांच्या मदतीने गरजू लोकांची यादी तयार करुन प्रत्यक्षात गावात जाऊन वस्तूंचे वाटप करण्यात आले.

मागील वर्षी पण कोकणातील हरिहरेश्वर या गावात निसर्ग चक्रिवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती…लाॅकडाऊन मध्ये पण किर्तनकारांना धान्याची मदत करण्यात आली होती.
तुळशीबाग व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नितीन पंडीत कार्याध्यक्ष मोहन साखरीया उपाध्यक्ष किरण चौहान, चेतन कावरे, निकेत देसाई, जितेंद्र अंबासनकर, किरण भंडारी, संदेश जव्हेरी, गणेश रामलिंग, गिरीश दंडवते ,सत्यजीत वाईकर, विकास देशमुख, तुळशीबाग मंडळाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ कावरे, कार्याध्यक्ष विकास पवार उपस्थित होते.
श्री तुळशीबाग पतसंस्थेचे अध्यक्ष जीवन हेंन्द्रे आणि ,राजूशेठ गिरे यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम पार पडला. जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त असोसिएशन च्या वतीने येथे झाडांची लागवड पण करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: