तिसरी लाट येऊ नये ही परमेश्वराकडे प्रार्थना – आबा  बागुल

पुणे – जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना गोरगरीब लोकांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भासली होती, समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येत होते,
आशा परिस्थितीत आबा बागुल हे गेल्या अनेक दिवसांपासून समाजोपयोगी कामे करीत होते गेल्या दोन महिन्यांपासून रोज दोन हजार गरजू लोकांना घरपोच अन्न देण्याचे काम त्यांनी केले ज्या लोकांना रोजीरोटी ची अडचण आहे .त्याना त्याच्या घरी जाऊन दोन वेळच्या जेवणाची सोय आबा बागुल व त्याच्या मित्र परिवाराकडून करण्यात आली.
6 जून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून घरपोच अन्न देण्याच्या कामाचा समारोप करण्यात आला.
यावेळी बोलताना आबा बागुल म्हणाले की तिसरी लाट येऊ नये ही परमेश्वराकडे प्रार्थना असून यदाकदाचित तिसरी लाट आली तरी आम्ही सर्वात समाजाची सेवा करण्यासाठी पुढे असू
समारोपच्यावेळी अमित बागुल मित्र मंडळाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: