आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कोविड लसीकरण’ केंद्राचे उद्‌घाटन

पुणे : पुण्याच्या पूर्व भागामध्ये लसीकरण केंद्र जवळ नसल्याने नागरिकांना गाडीखाना, भवानी पेठ, गुरूवार पेठ या केंद्रांवर जावे लागत होते. तेथेही प्रचंड गर्दी होत असून नागरिकांची गौरसोय  होत आहे. याची दखल घेऊन व आमदार नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेवक अजित दरेकर यांच्या प्रयत्नातून आज (दि. ५ जून ) घोरपडी पेठेतील उर्दू शाळा क्र. १३ मध्ये ‘‘कोविड लसीकरण’’ केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. लसीकरण केंद्राची सर्व व्यवस्था पुणे महानगरपालिका लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. कालेकर, डॉ. सय्यद, नर्स नंदिनी बनसोड, वॉर्ड इंजिनिअर सिमरण पिरजादे, आरोग्य निरिक्षक संजय सांळुके यांनी केले.

     या प्रसंगी नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, दत्ता सागरे, अतुल बेहेरे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्‌घाटन झाले. या केंद्रात प्रथम लस घेणाऱ्या ज्येष्ठ महिलेचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. या उद्‌घाटन प्रसंगी हेमंत राजभोज, रवि पाटोळे, आप्पा नाईक, मंगेश शेलार, अश्पाक शेख, आयुब पठाण, सईदभाई सय्यद, दादा पाटोळे, सलीम सय्यद, अनिल कुक्कर, पिंताबर खेडेकर, प्रमोद पाटोळे, विशाल गद्रे, नामदेव संकपाळ, उत्तम राऊत, विनोद मोरे, राजू भोंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: