निसर्गासोबत प्रगतीचे टप्पे गाठले पाहिजे – रमेश बागवे

पुणेः- करोनामुळे सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे निसर्गाचा -हास न करता निसर्गासोबत आपण प्रगतीचे टप्पे गाठले पाहिजे, असे मत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाडिया महाविद्यालया जवळील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या लता राजगुरु, रमेश सकट, मीरा शिंदे, मुन्ना शेख, रॉबर्ट डेव्हिड, भाई कात्रे, राजेंद्र शिरसाठ, प्रतीक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रमेश बागवे म्हणाले, निसर्गामध्ये मानवाचा वाढता हस्तक्षेप हा मनुष्यजातीच्या मुळावर उठणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त निसर्ग सेवा करुन आपण आपल्या पुढील पिढीचे संरक्षण करायला पाहिजे.

कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन महामाता भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीचे प्रमुख विठ्ठल गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: