Wednesday, October 21, 2026
Latest NewsPUNE

शिबिरातून मिळणार सदाचारमय जीवनाचे रक्षासुत्र- पं. जितेंद्र राठी

पुणे – समयसार-कहान शताब्दी महोत्सव वर्षान्तर्गत संपूर्ण भारतात धर्मप्रभावणेच्या हेतूने दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ‘जैन तत्वज्ञान संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. देशात कोव्हीड१९ संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन यंदा हे शिबिर ऑनलाईन माध्यमातून संपन्न करण्याचा निर्णय शिबीराचे आयोजक कमेटी परमागम प्रभावणा ट्रस्ट पुणे व सर्वोदय स्वाध्याय ट्रस्ट, हेरले यांच्या द्वारे निर्णय घेण्यात आला.

१२ जुन २०२१ पर्यंत असणाऱ्या या तत्वज्ञान शिबिराचा शुभारंभ रविवार दिनांक ६ जुन २०२१ रोजी सकाळी ८ वाजता अनंतभाई शेठ मुंबई, ब्रजलालजी हथाया (सभा अध्यक्ष), विनूभाई शाह(स्वागताध्यक्ष), विनोदजी निरखे(मलकापूर), कु. सुमी जैन सुपुत्री सुनिल सराफ(शिबिर उद्घाटनकर्ता), पारसजी पारेख (आमंत्रनकर्ता), सुकुमार चौगुले, विपीनजी शास्त्री(ध्वजारोहण कर्ता), कु. गाथा एवं चि. कलश राठी(मंगलाचरण), संजीवकुमार गोधा, जयपूर (मंगल उद्बोधन), पं.अनिल आलमाण व पं. प्रसन्न शेठे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाईल.

शिबीराचे उपक्रम सदाचारमय जीवनाचे रक्षासुत्र, नैतिक व आध्यात्मिक मुल्य, साधर्मी सौहार्द व लोकव्यवहार, जैनधरमाचे मुलभूत सिद्धांत ओळख, सप्त व्यसनापासून मुक्ती, आध्यात्मिक विषयाचे अध्यापन, देव- शास्त्र- गुरू यांची खरी ओळख, व्यतीमत्व विकास व स्वतःची ओळख इत्यादी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading