Wednesday, October 21, 2026
Latest NewsPUNE

आजच्या युवा वर्गाने प्रितीकेश चा आदर्श घ्यावा- प्रशांत जगताप

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते व पुणे मनपा प्रभाग क्रमांक १९ चे कार्याध्यक्ष प्रितीकेश चव्हाण यांनी आजच्या युवा वर्गातील मित्रांना नवा आदर्श घालून दिला. आज प्रितीकेश यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक बांधिलकी म्हणून व सद्यस्थितीचा अनुमान घेता, पुणे शहरात रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबीर आयोजित आले होते. प्रादेशिक रक्तपेढी ससून पुणे यांच्या सहाय्याने हे रक्त संकलित केले गेले. शिबीरात किमान पन्नास रक्त बॉटल्स संकलीत करण्याच्या संकल्प प्रितीकेश चव्हाण  मित्र परिवाराच्या वतीने केला होता.

भवानी पेठेतील महर्षी हरकादास विद्या मंदिर, हरका नगर येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे अध्यक्ष, नगरसेवक प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सोबतच माजी राज्यमंत्री रमेश दादा बागवे, राष्ट्रवादी पुणे कॅन्टाेन्मेट विधानसभा अध्यक्ष आनंद सावणे, स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे, बाळासाहेब दोडके, महेश हाण्डे, बाळासाहेब आहेर, निखिल भालेराव, ऋषीकेश येनमुल, मितेश चव्हाण, विनीत डोलगज, कुटुंबातील सदस्य, व मित्र परिवार उपस्थित होते. प्रशांत दादा यांनी उपक्रमाचे कौतुक केले व वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading