पीएमपीएमएल आणि सीओईपी यांच्यात सामंजस्य करार
पुणे – शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ओळख असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) व सन १८५४ मध्ये स्थापना
झालेले आणि “महाराष्ट्र सरकार” ची स्वायत्त संस्था असलेले “कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे” (सीओईपी) यांच्यात पीएमपीएमएलचे सशक्तीकरण करणेकामी
आवश्यक सुविधा पुरविणेसाठी २ जून २०२१ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप आणि सीओईपीचे संचालक प्रा. बी. बी. आहुजा यांनी स्वाक्षरी केली.
पीएमपीएमएल आणि पुणे येथील नामवंत अभियांत्रिकी संस्था म्हणून ओळख असलेले “कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे” (सीओईपी) यांच्यात झालेल्या या सामंजस्य करारामुळे फक्त पीएमपीएमएलचाच नाही तर पुण्याच्या नागरिकांचा देखील फायदा होणार आहे.
पीएमपीएमएल आणि सीओईपी यांच्यात झालेल्या या सामंजस्य करारामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे
१) पीएमपीएमएल आपली संचलन कार्यक्षमता सुधारण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध तंत्रज्ञानांचा उपयोग करते. गेल्या काही वर्षांत पीएमपीएमएल ने तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे राबविले आहेत तर काही प्रकल्प संकल्पनात्मक व नियोजनात्मक अवस्थेत आहेत.
आयओटी उपकरणांचे मिश्रण असलेल्या ओबीयू, डीडीयू इत्यादी युनिटचा बसमध्य वापर यासह पीओएस, ई तिकीट यंत्रणा, हार्डवेअर आणि विविध माहिती तंत्रज्ञान प्रणाली ज्यामध्ये इंटेलिजेंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टम
(आयटीएमएस), ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टम (एएफसीएस) यासह इतर बाबींचा देखील समावेश आहे.
२) पुढील काही वर्षांत पीएमपीएमएल आणि सीओईपी या दोन्ही संस्था आपापसात सहयोग वाढवून ई-मोबिलिटी, स्किल बिल्डिंग, तंत्रज्ञान आणि सायबर सिक्युरिटी ऑडिट, पीएमपीएमएलचे संचलन क्षेत्र या क्षेत्रांमधील कार्यक्षमता
वाढविण्यासाठी डेटा अॅनालिटिक्स,परिवहन अभियांत्रिकी, संशोधन आणि विकास,नावीन्यपूर्णता या बाबींचा उपयोग करून प्रगती साधतील.
३) वरील व्यापक उद्दीष्ट नजरेसमोर ठेऊन पीएमपीएमएल आणि सीओईपी या दोन्ही संस्थांच्या सहकार्य व समन्वयातून आपआपल्या सर्वोत्तम क्षमता व कौशल्य
यांची देवाणघेवाण करून आवश्यकतेनुसार वेळोवेळी वाहतूक नियोजन व मार्गांमध्ये आवश्यक त्या कमाल सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी बोलताना पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.राजेंद्र जगताप म्हणाले, “पीएमपीएमएल तंत्रज्ञान आणि परिवहन
अभियांत्रिकीशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. सीओईपी सारख्या तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या नामवंत, अग्रगण्य संस्थेशी भागीदारी
आमच्या बर्यााच प्रयत्नांमध्ये मदत करेल आणि पीएमपीएमएलची व्यापकता आणि कार्यक्षमता वाढून पीएमपीएमएलला प्रगती साधण्यासाठी सहाय्यभूत ठरेल.”
या भागीदारीचे स्वागत करत सीओईपीचे संचालक प्रा. बी.बी. आहूजा म्हणाले, “सीओईपी ही देशातील सर्वात जुनी संस्था असून या संस्थेला १७७ वर्षांचा देशसेवेचा वारसा आहे. आमच्या संस्थेकडे केवळ आमच्या संस्थेसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी दूरदृष्टी आहे. अभियांत्रिकीचा उपयोग व अभियांत्रिकीचा प्रयोग करीत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. शहर वाहतुकीची लाईफलाईन असलेल्या पीएमपीएमएलशी निगडित राहून आम्ही एक अशी भागीदारी सामायिक करू जे नक्कीच या मूल्यांना जोडेल व पीएमपीएमएलच्या सेवेच्या दर्जामध्ये आणखी वृद्धी होईल. सीओईपी कडून विविध तंत्रज्ञानाचा
उपयोग केला जाईल जेणेकरून पीएमपीएमएलच्या दैनंदिन संचलन कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होऊन नागरिकांची चांगली सोय होईल. तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना थेट प्रकल्पांवर (Live Projects) काम करण्याची संधी उपलब्ध होईल. या प्रकल्पांमध्ये बसमध्ये बसविलेल्या आयओटी उपकरणांच्या मिश्रणाचा
समावेश आहे. ई-तिकीट मशीन, हार्डवेअर आणि विविध आयटी प्रणालीचा समावेश असून केवळ इंटेलिजेंट ट्रान्झिट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस), ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टम (एएफसीएस) पर्यंत मर्यादित नाही. पीएमपीएमएल बरोबरची ही भागीदारी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इतर पायाभूत विकासास बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. “
