Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

सोलापूर – वीस दुचाकी आगीत जळून खाक

सोलापूर – पोलिसांनी जप्त केलेल्या वीस दुचाकी अकस्मात आगीत जळून खाक झाल्या आहेत. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या वीस दुचाकी अकस्मात लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत.
सोलापुरातील सदर बजार पोलीस ठाण्याच्या पाठीमागे पोलिसांनी केलेल्या विविध कारवाईतील मोटारसायकली मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्या होत्या. मात्र,अचानक लागलेल्या आगीत 20 मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत.
अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय.अशी माहिती पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading