Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

रिक्षा व टॅक्सी भाडे मिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत रिक्षा व टॅक्सी भाडेमिटरचे रिकॅलिब्रेशन करण्याकरिता ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑटोरिक्षा/टॅक्सी मिटर रिकॅलिब्रेशनसाठी १५ एप्रिल ही मुदत होती. तरी सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सी मालक/चालक यांनी ब्रेक द चेन अंतर्गत नियमानुसार विहित कालावधीमध्ये ऑटोरिक्षा व टॅक्सी मीटरचे रिकॅलीब्रेशन करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading