Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Big Breaking : पुण्यातील लॉकडाऊन शिथिल, सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने उघडणार

पुणे : शहरातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. अशावेळी पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येतेय. उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहे. तसंच सरकारी कार्यालयेही 25 टक्के उपस्थितीत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

उद्यापासून काय सुरु राहणार?

  1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार
  2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु राहणार
  3. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील.
  4. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील
  5. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील.
  6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.
  7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरु करणेस मुभा राहील.

काय बंद असणार?

  1. पुण्यातील उद्याने, मैदान, जिम, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार
  2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार.
  3. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading