fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

भाजपच्या केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरात 200 हुन जास्त सेवा कार्यक्रम – जगदीश मुळीक

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज ( 30 मे ) 7 वर्षे पूर्ण होत आहेत, या 7 वर्षात मोदींनी देशात आमुलाग्र बदल घडविले व देशाला प्रगतीपथावर नेले, हे करत असताना नरेंद्र मोदी यांच्या कार्याची जागतिक पातळीवर दाखल घेतली गेली असे भाजप शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक म्हणाले.आज केंद्रातील भाजप सरकार ला 7 वर्षे पूर्ण होत आहेत त्याप्रित्यर्थ शहरात आनंदोत्सव ना करता गरजूना मदत करून सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आणि आज शहरात तब्ब्ल 200 ठिकाणी सेवाभावी उपक्रम होत आहेत असे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे त्यानुसारच सेवा सप्ताहाच्या माध्यमातून भाजप चे कार्यकर्ते विविध प्रकल्प राबवत असल्याचे ही जगदीशजी मुळीक यांनी स्पष्ट केले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सेव्ह द चिल्ड्रेन च्या वतीने आज दिव्यांगाना एक हात मदतीचा ह्या उपक्रमा अंतर्गत किराणा मालाची मदत देण्यात आली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शहर सरचिटणीस दीपक पोटे, गणेश घोष, राजेश येनपुरे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेचे हरीश वैद्य, मिताली सावळेकर,प्रवक्ता धनंजय जाधव आदी उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन चे सेवाकार्य अविरत सुरु असून समाजातील उपेक्षित वर्गाला एक हात मदतीचा हा उपक्रम राबविताना शहरातील अनेक दानशूर आमच्या पाठीशी उभे राहिले असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. ह्या संकट काळात शहरातील नागरिकांच्या संवेदनशीलतेचा परिचय झाला आणि शब्दश: हजारो हात मदतीसाठी पुढे आले हे शहराचे वैशिष्ट्य पुणेकरांनी जपले असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेचे हरीश वैद्य, भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. निलेश गरुडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading