Thursday, June 18, 2026
PUNE

जाधवर इन्स्टिटयूटतर्फे ‘लॉकडाऊन व्याख्यानमाला’

पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या वतीने लॉकडाऊन व्याख्यानमाला या विशेष उपक्रमाचे आॅनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरतील, असे विषय या व्याख्यानमालेत मांडण्यात येत आहेत.
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत डॉ.सुधाकर जाधवर यांची ३५ आणि अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांची १४ व्याख्याने झाली आहेत.

गुजरात आणि गुजराती समुदाय, मारवाडी समुदायाचे यश, दुबईचे दूरदृष्टी असलेले आश्वासक नेतृत्व शेख मोहम्मद बिन रशीद अल मुख्ताक या विषयांवरील व्याख्यानातून प्रेरणादायी विचार प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी, रा.स्व. संघ संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रासाठी केलेले कार्य त्यांच्या जीवन चरित्रातून सांगण्यात आले. बिल गेट्स, मायकल फिलिप्स, सर रतन टाटा, वॉरन बफे, सचिन तेंडुलकर, मेरी कोम यांचे आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य देखील व्याख्यानमालेतून मांडण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, जीवनात प्रगती करण्यासाठी कोणाला तरी आदर्श ठेवून त्याच्या मार्गाचे अनुसरण करत पुढे जायचे असते. राष्ट्रासाठी काम केलेल्या व्यक्तींच्या जीवन चरित्रातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. शालेय जीवनापासूनच मुलांच्या मनावर त्यांचे कार्य आणि विचार बिंबवायला हवेत. यासाठी शाळा बंद असताना लॉकडाऊनच्या काळात आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व, उद्योग, क्रीडा यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading