Saturday, May 30, 2026
PUNE

‘तेर पॉलिसी सेंटर’ च्या वतीने जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्व संध्येला वेबिनार

पुणे : ‘तेर पॉलिसी सेंटर’ च्या वतीने ‘परिसंस्थेची पुनर्रचना ‘ या विषयावर जागतिक पर्यावरण दिवसाच्या पूर्व संध्येला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसंवाद ४ जून २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईन होईल. ‘तेर पॉलिसी सेंटर’ च्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘एम आय टी -डब्ल्यू पी यू ‘ चे संशोधक डॉ.पंकज कोपर्डे,’फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल’ च्या सल्लागार शादी जहान बिन,’ओशन गव्हर्नन्स लिमिटेड ‘ चे संचालक सुनील मुरलीधर शास्त्री ,डॉ कलाम संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त पर्यावरण प्रेमी मंजींदर कौर हे या परिसंवादात सहभागी होतील. ‘तेर पॉलिसी सेंटर’ चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading