Saturday, May 30, 2026
BusinessLatest News

आठ हॉस्पिटल्सना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आत्मनिर्भर करण्यासाठी यूपीएलचा पुढाकार

पुणे – जागतिक स्तरावर शाश्वत कृषीउपाययोजना पुरविणा-या यूपीएलने ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी गुजरातमध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि नवी दिल्ली येथील आठ हॉस्पिटल्समध्ये प्लान्ट्स बसविल्याचे कंपनीने आज जाहीर केले. कोव्हिड रुग्णांच्या संख्येमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे देशभरात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येला प्रतिसाद देताना कंपनीने तातडीने आपल्याजवळील नवतंत्रज्ञान वापरात आणले आणि गुजरात व उत्तर प्रदेशातील चार हॉस्पिटल्सना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने आपले चार नायट्रोजन निर्मिती प्लान्ट्स ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट्समध्ये परिवर्तित केले. हे प्लान्ट्स स्किड माउंटेड असून ते थेट हॉस्पिटलच्या जागी पोहोचवण्यात आले, जेणेकरून हॉस्पिटल्सनी ते थेट आपल्या ऑक्सिजन हेडर यंत्रणेमध्ये प्लग इन करावेत व ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनावे.

 

हे रूपांतरीत प्लान्ट्स बसविलेल्या हॉस्पिटल्समध्ये वाराणसी येथील चौका घाट सरकारी आयुर्वेदिक कॉलेजवापी येथील हारिया एल जी रोटरी हॉस्पिटलअंकलेश्वर येथील जयाबेन हॉस्पिटल आणि भरूच येथील जंबुसारमधील सरकारी हॉस्पिटलचा समावेश आहे. याशिवाय यूपीएलने नवी दिल्लीतील पातपरगंज येथील मॅक्स हॉस्पिटलमध्येही डायरेक्ट ऑक्सिजन प्लान्ट बसविला असून इंदोरग्वाल्हेर आणि वाराणसी येथे आणखी तीन प्लान्ट्स पुरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व आठ ऑक्सिजन प्लान्ट्सची मिळून १,००० बेड्सना ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता आहे. याशिवाय यूपीएलने गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील स्थानिक चीफ मेडिकल ऑफिसरच्या देखरेखीखाली व्हेन्टिलेटर्सऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सकोव्हिड औषध संचांचाही पुरवठा केला आहे.

या घडामोडीबद्दल बोलताना यूपीएल लि. चे सीईओ जय श्रॉफ म्हणाले, “यूपीएलमध्ये आम्ही ‘ऑलवेज ह्युमन’ राहण्याच्या अर्थात सतत मानवतावादी दृष्टिकोन जपण्याच्या आमच्या तत्त्वाशी बांधिल आहोत. या खडतर कालामध्ये नायट्रोजनला ऑक्सिजनमध्ये परिवर्तित करण्याची आगळीवेगळी उपाययोजना राबवत आपल्यातील अनुकरणीय चपळतेचे व नवे प्रयोग करण्याच्या क्षमतेचे प्रत्यक्ष उदाहरण दाखवून दिले यासाठी आमच्या टीमचा आम्हाला अभिमान आहे. महामारीविरोधातल्या या लढ्यामध्ये आमचा खारीचा वाटा उचलत यापुढेही आम्ही समाजाला आपले पाठबळ देत राहू. “

वापी येथील हारिया एलजी रोटरी हॉस्पिटलच्या वैद्यकीय सेवा विभागाचे संचालक डॉ. एस. एस. सिंग म्हणाले, “आम्ही ६० आयसीयू बेड्स असलेल्या व व्हेंटीलेटर्सपासून ते ऑक्सिजनपर्यंत सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या कोव्हिड कॅम्पची स्थापना केली आहे. मात्र, ऑक्सिजनच्या अनियमित पुरवठ्याची समस्या हे बेड्स वापरण्याच्या आड येत होती. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी आम्ही यूपीएलशी संपर्क साधला व त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये एक स्किड माउंटेड ऑक्सिजन प्लान्ट बसविला, ज्याची आम्हाला नितांत गरज होती. हा प्लान्ट बसविल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यावर हा प्लान्ट प्रती मिनिट ३००-३५० लीटर्स इतक्या ऑक्सिजनची निर्मिती करत असून एकाचवेळी ३०-४० रुग्णांना तो सहज पुरू शकतो. आम्हाला या सुविधेची जेव्हा सर्वाधिक गरज होती तेव्हाच यूपीएलने उदारपणे आणि वेळच्या वेळी दिलेल्या या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading