Thursday, June 18, 2026
PUNE

‘ग्रीन हायड्रोजन’वर ‘टीटीए’तर्फे डॉ. दिलावर सिंग यांचे रविवारी व्याख्यान

पुणे : टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनतर्फे (टीटीए) ‘ग्रीन हायड्रोजन : २१ व्या शतकाचे इंधन’वर ऑस्ट्रेलियास्थित डॉ. दिलावर सिंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्या (रविवार, ३० मे २०२१) सकाळी १० वाजता झूम मिटद्वारे हे व्याख्यान होणार आहे. ‘टीटीए’चे हे ५८ वे व्याख्यान आहे. आयआयटी दिल्लीतून सोलर एनर्जीमध्ये पीएचडी केलेले आणि ऑस्ट्रेलियाला स्थायिक होण्याआधी भारतातील विविध नामवंत कंपन्यात काम केलेले डॉ. दिलावर सिंग ‘ग्रीन हायड्रोजन व इतर सौर ऊर्जेचे पर्याय’ याबाबतीत बोलणार आहेत. यावेळी ‘टीटीए’चे अध्यक्ष यशवंत घारपुरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘टीटीए’चे सहसचिव अजित चौगुले यांनी दिली आहे.

डॉ. दिलावर सिंग यांनी ऑस्ट्रेलियात सन ब्रिलियन्स कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियात दोन लाख टन प्रति वर्ष ग्रीन हायड्रोजन निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प, लिथियम बॅटरी प्रकल्प उभारले आहेत. अलीकडच्या काळात प्रदूषणमुक्त ग्रीन हायड्रोजन इंधन म्हणून कसे उपयुक्त आहे, या सगळ्याचा उहापोह डॉ. दिलावर सिंग आपल्या भाषणात करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, यात सहभाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी http://www.techdatabank.co.in/ या संकेतस्थळाला किंवा technologytransfer0@gmail.com भेट द्यावी, असेही चौगुले यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading