fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNESports

अश्व शर्यतींशी संबधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात

पुणे, दि. २९ – आरडब्ल्यूआयटीसी म्हणजेच रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड तर्फे ‘हॉर्स रेसिंग’ अर्थात अश्व शर्यतींशी संबधित कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. सदर उपक्रमाला आज पुण्यातील टर्फ क्लब येथून सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत पुणे व मुंबई स्थित ५ हजाराहून अधिक व्यक्तींचे कोविडशिल्ड या लसीच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये टर्फ क्लबचे कर्मचारी, अश्व शर्यतीत भाग घेणाऱ्या घोड्यांचे प्रशिक्षक, जॉकी (घोडेस्वार), अश्व शर्यतींशी संबधित अर्माचारी आणि घोड्यांच्या तबेल्यांची निगा राखणाऱ्या कामगारांचा समावेश असणार आहे.

दिलीप ठक्कर, डॉ. अनिता व सुरेंद्र सणस यांच्या पुढाकाराने वर नमूद लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यासाठी त्यांना डॉ. सायरस पूनावाला यांचे सहकार्य लाभले आहे.  विलु पूनावाला रुग्णालयाचे प्रतिनिधी लसीकरणाची प्रक्रिया राबवत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading