Monday, June 22, 2026
Latest NewsLIFESTYLEMAHARASHTRAPUNE

एमटीडीसीची ‘वर्क फ्रॉम नेचर‘ सुविधा

कोरोंना काळात अनेकांना ‘वर्क फ्रॉम होम’  करून कंटाळा आलंय ? बदल हवाय ? मग तुमच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) घेवून आलय ‘वर्क फ्रॉम नेचर‘ सुविधा. त्यामुळे आता निसर्गाच्या सानिध्यात राहून ऑनलाईन काम करण्याची पर्याय उपलब्ध झाला आहे.

‘वर्क फ्रॉम नेचर’ संकल्पनेंतर्गत एमटीडीसीने राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली जात आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येत आहे. ‘वर्क फ्रॉम नेचर’ बरोबरच योगा आणि मेडिटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. तर पुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा सुरु होईल. एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.

दरम्यान, सध्या पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदि‍क काढा, व्हिटॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपट्टी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading