Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘‘डिझेल, पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी दर कमी करा’’ काँग्रेस पक्षाची डिझेल – पेट्रोल दरवाढी विरूध्द जोरदार निदर्शने.

पुणे – पेट्रोल व डिझेल यांच्या किंमतीमध्ये रोज थोडी थोडी वाढ करून आता पेट्रोलने १०० रूपयांचा टप्पा ओंलडला आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य गरीब व मध्यमवर्गीयांच्या हाल अपेष्ठामध्ये भर घातली असून मोदी सरकार मात्र निष्क्रीय व झोपी गेलेली आहे. जनतेचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही. या कोरोना काळात आता डिझेल व पेट्रोलचे दर तातडीने कमी करावेत व त्यासाठी डिझेल, पेट्रोलवरील केंद्रसरकारचा अबकारी कर (एक्साईज ड्युटी) मोठ्या प्रमाणात कमी करावी अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे डिझेल, पेट्रोल दरवाढी विरोधच्या आंदोलनावेळी केली गेली.

 सरस्वती पेट्रोल पंप, शंकरशेठ रोड येथे झालेल्या डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात झालेल्या निदर्शनामध्ये शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, पुणे मनपा गटनेते आबा बागुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निदर्शनांच्या वेळी अनेक नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या आंदोलनात सहभागी होऊन मोदी सरकारचा धिक्कार केला.

 या प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘गेल्या ७ वर्षात मोदी सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. महागाई, बेकारी, कोरोना यांची झळ प्रत्येक नागरिकाला पोहचत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता स्वत:ची प्रतिमा कुरवळत बसण्याऐवजी नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असून जनतेच्या हिताचे आतातरी निर्णय घ्या असे ते म्हणाले.’’

  प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कच्च्या तेलाचे दर आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत १४० डॉलर्स प्रती बॅलर एवढे पोहचले होते. तरीही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली डॉ. मनमोहन सिंग सरकारने देशातील पेट्रोलचे दर ७० रूपये प्रती लिटर एवढे मर्यादित ठेवले. मोदी सरकारने मात्र आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ३० डॉलर्स प्रति बॅलर एवढे खाली येऊनही जनतेला दिलासा न देता उलट एक्साईज ड्युटी वाढविली म्हणूनच पेट्रोलने शंभरी गाठली आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची कुवत व धमक मोदी सरकारमध्ये नसून मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे अशी टिका त्यांनी केली.’’

 पुणे मनपा गटनेते आबा बागुल म्हणाले की, ‘‘पेट्रोल ही आता चैनीची बाब नसून प्रत्येकाच्या गरजेची बाब बनली आहे. रोज थोड्या – थोड्या केलेल्या दरवाढीमुळे पेट्रोल आता शंभरीवर गेले असून सर्वसामान्य जनतेचा पाठिचा कणा मोडला आहे. डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढणार आहे. कोरोना काळात जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांच्या हाल अपेष्ठांमध्ये मोदी सरकार भर घालत आहे. याचा प्रत्येकाने निषेध केला पाहिजे.’’

 या आंदोलनाच्या वेळी डिझेल, पेट्रोल दरवाढी विरोधी घोषणा देण्यात आल्या. तसेच जनता विरोधी मोदी सरकारचा धिक्कारही करण्यात आला. या प्रसंगी शेकडो नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या निदर्शनात सहभाग घेतला व मोदी सरकारच्या धोरणांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

 सदर आंदोलनात माजी महापौर कमल व्यवहारे, नीता रजपूत, सुनिल शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, ब्लॉक अध्यक्ष सतिश पवार, रमेश सोनकांबळे, भरत सुरणा, सीमा महाडिक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading