Saturday, June 13, 2026
PUNE

लायन्स क्लबच्या उपप्रांतपालपदी विजय सारडा यांची निवड 

पुणे : लायन्स प्रांत ३२३४ डी २ च्या द्वितीय उपप्रांतपालपदी विजय सारडा यांची निवड झाली आहे.  लायन्स क्लबच्या ऑनलाईन प्रांत परिषदेत बहुमताने त्यांची निवड करण्यात आली.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रांतपाल अभय शास्त्री होते. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त  कृष्ण प्रकाश, लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रवीण छाजेड, माजी प्रांतपाल राज मुछाल, बी.एल.जोशी,जितेंद्र मेहता उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन लायन्सचे माज़ी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी यांच्या हस्ते झाले.या प्रांतीय परिषदेमध्ये  प्रथम उपप्रांतपाल म्हणून राजेश कोठावदे तर २०२१-२२ साठी प्रांतपाल  म्हणून हेमंत नाईक यांची निवड झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये १०० ऑक्सिजन बँकचा महत्वकांक्षी उपक्रम विजय सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. लायन्सचे  प्रांत जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम पहिले आहे. तसेच ग्लोबल ऍक्शन टीमचे समन्वएक म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

 याशिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लबच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेतील २ लाख मुलांची  मोफत डोळे तपासणी करण्यात आली आहे. तसेच मित्रमंडळ चौकात डोळ्यांचे हॉस्पिटल आणि डायलिसिस सेंटर सुरु करण्यात येत आहे. ग्रामीण भागात व्हिजन क्लीनिक देखील त्यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लबच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading