Saturday, May 30, 2026
PUNE

तंत्र शिक्षण परिषदेच्या सहकार्याने भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये प्रशिक्षण उपक्रम आणि परिषदेचे आयोजन

पुणे : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची ट्रेनिंग अँड लर्निंग ऍकेडमी (अटल)च्या सहकार्याने भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.३१ मे ते ४ जून रोजी ‘मास्टर क्लास आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डीप लर्निंग’या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम,८ ते १० जुलै रोजी ‘इमर्जिंग मार्केट्स,ट्रेंड्स,चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद,२० ते २४ सप्टेंबर रोजी ‘ईनोव्हेशन मॅनेजमेंट ‘विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
‘मास्टर क्लास आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डीप लर्निंग’ विषयावर ३१ मे ते ४ जून रोजी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयोजित करण्यात आला आहे. डॉ सचिन वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे संयोजन डॉ श्याम शुक्ला हे करीत आहेत. ८ ते १० जुलै रोजी ‘इमर्जिंग मार्केट्स,ट्रेंड्स,चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटी’ विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. डॉ सचिन वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे संयोजन डॉ श्याम शुक्ला,डॉ श्रद्धा वेर्णेकर हे करीत आहेत.

‘इनोव्हेशन मॅनेजमेंट ‘ या विषयावर २० ते २४ सप्टेंबर रोजी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम होणार असून डॉ सचिन वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे संयोजन डॉ सचिन आयरेकर हे करीत आहेत. http://www.imed.bharatividyapeeth.edu/ या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading