Saturday, May 30, 2026
PUNE

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बघितला ‘साखर शाळा’ लघुपट

पुणे – सहकार आणि पणन मंत्री  बाळासाहेब पाटील यांना साखर शाळा हा लघुपट दाखवण्यात आला. स्थलांतरामुळे होणारे ऊस तोड कामगार मुलांचे अपुरे शिक्षण या विषयावर आज साधक बाधक चर्चा झाली. यावेळी साखर आयुक्त श्री. शेखर गायकवाड , संवादचे सुनील महाजन व चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, धनंजय भावलेकर उपस्थित आले.
हा चित्रपट पाहिल्यानंतर  मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांची शैक्षणिक विषयासंदर्भात लवकरच नवीन उपक्रम राबविले जातील, या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देता येईल या संदर्भात विचार व्यक्त केला.
ही फिल्म आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सवात पाठवण्यात येईल आणि लवकरच या फिल्मचा प्रीमियर  पुणे येथे होईल असेही धनंजय भावलेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading