धूम्रपान करणे सीओपीडीसाठी एक मुख्य जोखीम वाढविणारा घटक आहे
चला या जागतिक तंबाखू विरोधी दिनी तंबाखूच्या साथरोगाकडे लक्ष वेधू या
फुफ्फुसांच्या आजारासह एकाधिक जुन्या आजारासाठी तंबाखूचा वापर हा धोकादायक घटकांपैकी एक आहे. भारतात तंबाखूचा सर्रास वापर होतो. मुख्य म्हणजे दरवर्षी यामुळे 1.35 दशलक्ष मृत्यू होतात. भारतात होणाऱ्या मृत्यू आणि आजारांच्या प्रमुख कारणांपैकी हे एक आहे. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडिया (2016-17) नुसार जवळ-जवळ 277 दशलक्ष प्रौढ (15 वर्षे किंवा त्याहून अधिक) म्हणजेच भारतातील सर्व प्रौढांपैकी 29% लोकं तंबाखूचा सर्रास वापर करतात. जीएटीएस -2 च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की प्रत्येक 8 तरुणांपैकी 1 (15 ते 24 वर्षे वयोगटातील) भारतीय तंबाखूचे काही ना काही प्रकार वापरतातच.
भारतात तंबाखूच्या वापराचे सर्वाधिक प्रचलित रूप म्हणजे धूर रहित तंबाखू, सामान्यतः खैनी, गुटखा, तंबाखूसह सुपारी आणि जरदा आदींचा यात समावेश आहे. हे सुद्धा तितकेच घटक आहेत. भारतात वापरल्या जाणार्या तंबाखूच्या धूम्रपान प्रकारात बिडी, सिगारेट आणि हुक्का १ यांचा समावेश आहे. सक्रिय आणि निष्क्रिय दोन्ही सीओपीडीसाठी धूम्रपान हा एक जोखमीचाच घटक आहे. खरं तर, बालपणात निष्क्रिय धूम्रपान करण्याच्या सवयीमुळे भविष्यातील क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर (सीओपीडी) चा मार्ग प्रशस्त होऊ शकतो.
जागतिक तंबाखूविरूद्ध दिनाच्या निमित्ताने डॉ एस के टोके, एमबीबीएस डीएनबी (रेस्पिरेटरी मेडिसिन), पवना हॉस्पिटल, सोमाटणे पुणे यांनी तंबाखूचा वापर आणि श्वसन रोगाचा धोका यांच्यातील संबंधावर भर दिला. तंबाखूचा वापर करण्याचा एक सामान्य प्रकार म्हणजे सिगारेटचा धुम्रपान होय . त्यांनी धूम्रपान करण्याचे परिणाम आणि सोडण्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “धूम्रपान करण्यामुळे पूर्वी हा धोका होत असे कि फुफ्फुसांच्या कार्यामध्ये घट होण्याचे प्रमाण जास्त होते. जेव्हा धूम्रपान सतत चालू ठेवली जाते तेव्हा सीओपीडी सारखे आजार फुफ्फुसाचे कार्य खराब करतात. सुदैवाने, कोणत्याही रूपात धूम्रपान करणे किंवा तंबाखूचा वापर करणे जर सोडले आणि आपल्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि फुफ्फुसाचे कार्य खराब होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्या फुफ्फुसांना अधिक नुकसान होण्यापासून वाचविण्यासाठी धूम्रपान आधी सोडणे चांगले.
सीओपीडी हा एक सामान्य श्वसन रोग आहे जो भारतातील आजारपणाचे एक मुख्य कारण आहे, खरं तर, 2019 साली हे भारतातील मृत्यूचे सर्वात मोठे दुसरे कारण होते. आकडेवारीवरून असे दिसून येते कि भारतीय सीओपीडी रुग्ण आपल्या उत्पन्नाच्या सरासरी 15% धूम्रपानासाठी वापरात येणाऱ्या उत्पादनांवर आणि 30% पर्यंत रोग व्यवस्थापनावर खर्च करतात. ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह (जीओएलडी) २०२१ च्या अहवालामध्ये ठळकपणे नमूद केले आहे की “धूम्रपान” हाच सीओपीडीसाठी एक मुख्य जोखमेचा घटक आहे आणि सीओपीडी असलेल्या रूग्णांमध्ये चिडचिडेपणा / लक्षणे बिघडण्यासाठी एक प्रमुख कारण सुद्धा आहे. धूम्रपान केल्याने फुफ्फुसाचे नुकसान होऊ शकते. इतक्या स्तरापर्यंत की हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे ही साधारण क्रिया करने सुद्धा कठीण होते, ज्यामुळे सीओपीडीमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि इतर लक्षणे उद्भवतात. म्हणूनच, धूम्रपान सोडण्याचा सल्ला दिला जातो.
डॉ एस के टोके, यांच्या मते , “जर तुम्हाला सीओपीडी असेल तर धूम्रपान सोडणे, सर्व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सोडणे आणि निष्क्रीय धूम्रपान करणे टाळणे ही तुमच्या फुफ्फुसांचे रक्षण करण्यासाठी आणि सीओपीडीची लक्षणे वाढण्यापासून रोखण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. हे आपल्याला अधिक सक्रिय राहण्यास आणि जीवनाचा आनंद घेण्यास मदत करू शकते. आपले कुटुंबिय आणि मित्रांजवळ आपल्या धूम्रपान सोडण्याच्या ध्येयाबाबत सांगून ते ध्येय गाठण्याचे प्रयत्न करा. असे लोकं आणि परिस्थितीपासून दूर रहा ज्यामुळे तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा निर्माण होते. यावर ताणतणाव मदत करणार नाही त्यामुळे एका दिवसात एकदाच वेळी निर्णय घ्या. आवश्यक असल्यास, आपण आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे आणि त्यांची मदत घेतली पाहिजे.
