मर्सिडीज-बेंझच्या संपूर्णतः नवीन ‘जीएलए’ व ‘एएमजी जीएलए ३५ ४एम’ बाजारपेठ व डिजिटल स्टोरमध्ये आज दाखल
पुणे: भारतातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझने जीएलए व एएमजी जीएलए ३५ ४एम या संपूर्णतः नवीन गाड्या भारतभरात जिथे उद्योगव्यवसाय सुरु आहेत तिथे सर्वत्र उपलब्ध करवून देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ऑनलाईन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना या दोन्ही एसयूव्हीज् कंपनीच्या ऑनलाईन स्टोरवर देखील खरेदी करता येतील. जीएलएचा शुभारंभ एप्रिलमध्ये करण्यात येणार होता पण तेव्हाच्या कोविड परिस्थितीमुळे आता मे महिन्याच्या शेवटी या गाड्या बाजारपेठेत दाखल करण्यात येत आहेत. ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, व्यवसाय निरंतरतेला बळ देण्यासाठी आणि रिटेल नेटवर्कच्या आर्थिक स्थिरतेसाठी कंपनीने आपल्या या दोन नव्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध करवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, “आमच्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो आणि आमच्या आजूबाजूच्या समाजाच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देत आहोत. त्याचवेळी व्यवसाय सुरळीतपणे चालत राहणे, आमच्या नेटवर्कला आणि संपूर्ण इकोसिस्टिमला पाठिंबा दिला जाणे या देखील महत्त्वाच्या बाबी आहेत, सध्याच्या काळात आर्थिक पातळीवर आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि भविष्याच्या दृष्टीने सकारात्मक दृष्टीकोन कायम राखण्यासाठी आम्हाला या बाबींची मदत होत आहे. २०२१ साठी आम्ही जे धोरण आखले होते त्यावर आम्ही आजही ठाम आहोत.”

श्वेन्क म्हणाले, “नवीन जीएलए अधिक जास्त प्रभावी, उठावदार असून आधीच्या गाड्यांच्या तुलनेत नवीन जीएलएमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात आला आहे. दीर्घकाळापासून या गाडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांच्या सर्व इच्छा यानिमित्ताने पूर्ण होतील यात काहीच शंका नाही. ही एसयूव्ही आता स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या एएमजीच्या रूपात एएमजी जीएलए ३५ ४एम म्हणून दाखल केली जात आहे. हे आमचे तिसरे एएमजी मॉडेल आहे. या उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम ८ वर्षांची वाढीव वॉरंटी इंजिन आणि ट्रान्समिशनवर दिली जात असल्याने जीएलए आणि एएमजी जीएलए ३५ ४एमचे अनोखेपण अधिकच वाढले आहे आणि ग्राहकांना आनंदाबरोबरीनेच संपूर्ण मनःशांती देखील लाभेल. देशभरात जिथे-जिथे आर्थिक उद्योगव्यवसाय सुरु आहेत तेथील ग्राहकांना या गाड्या विकत घेता येतील. “
