Saturday, June 13, 2026
Business

फ्रीचार्जने आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली ‘पे लेटर’ सुविधा

गुरुग्राम – आर्थिक सेवा पुरवणाऱ्या आघाडीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सपैकी एक फ्रीचार्जने आपल्या ग्राहकांसाठी ‘पे लेटर’ सुविधा सुरु केली आहे.  यामुळे ग्राहकांना त्यांच्या छोट्या रकमांच्या खरेदींसाठी फक्त एक क्लिक करून पेमेंट करता येईल. महिन्याभराचे खर्च जमा होत जातील आणि ग्राहकांना महिन्याच्या शेवटी त्याचे पेमेंट करता येईल. ‘पे लेटर’ सुविधेचा उपयोग फ्रीचार्जच्या प्लॅटफॉर्मवर तसेच १०००० पेक्षा जास्त व्यापाऱ्यांच्या नेटवर्कमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करता येईल.

‘पे लेटर’ चा उपयोग ग्राहक त्यांची वीज बिले भरण्यासाठी, मोबाईल्स रिचार्ज करण्यासाठी, खाणे, औषधे, वाणसामान ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या कार्डची गरज न भासता करू शकतात.  डिजिटल पेमेंट्सच्या इतर पर्यायांपेक्षा पे लेटर वेगळे आहे, यामध्ये कार्ड नंबर सेव्ह करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची, वॉलेट लोड करण्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या ओटीपी मंजुरीची आवश्यकता नसते.  सर्व पेमेंट्स अगदी सुरक्षित पद्धतीने एका क्लिकसरशी केली जाऊ शकतात.

ही नवी सुविधा सुरु करत असल्याबद्दल फ्रीचार्जचे सीईओ सिद्धार्थ मेहता यांनी सांगितले, “युजर्ससोबतचे आमचे संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी आम्ही त्यांच्यासाठी ही खास सुविधा सादर करत आहोत, ज्यामध्ये क्रेडिट सीमा असून युजर्सना सहजसोप्या पेमेंट प्रक्रियेचा अनुभव घेता येईल.  यामध्ये आमच्या ग्राहकांना त्यांच्या छोट्या रकमांच्या खरेदीचे पैसे रोख किंवा कार्डद्वारे देण्याऐवजी मोबाईलवरून अगदी सहज देता येतील.  ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही खरेदींमध्ये याचा वापर करता येईल.  सध्या डिजिटायझेशन अतिशय वेगाने होत आहे, अशा काळात विनासायास पेमेंट करता येणे ही ग्राहकांच्या दृष्टीने एक महत्त्वाची सुविधा आहे.”

‘पे लेटर’ सुविधा यशस्वीपणे लागू करून घेतल्यावर ग्राहकांना ५००० रुपयांपर्यंतचे मासिक क्रेडिट लिमिट मिळते आणि प्रत्येक ग्राहकाच्या प्रोफाईलनुसार भविष्यात या क्रेडिट लिमिटमध्ये वाढ देखील होऊ शकते.

मेहता यांनी पुढे सांगितले, “आम्ही आता याची फक्त सुरुवात केली आहे, त्यामुळे या एकंदरीत प्रक्रियेची ग्राहकांना सवय होईपर्यंत आम्ही वापराची सीमा थोडी कमी ठेवली आहे.  आम्हाला असे वाटते की यातून आमचे ग्राहक आणि आम्ही देखील खूप काही शिकू शकू आणि त्यातून अनेक, अधिक जास्त खास, ग्राहकांच्या विशेष गरजा पुरवणारी उत्पादने तयार करू शकू.  भविष्यात ग्राहकांच्या गरजा, इच्छांनुसार खास पर्याय घेऊन येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

‘पे लेटर’साठी अतिशय माफक प्रोसेसिंग फी व खूपच कमी व्याज आकारले जाणार आहे.  महिन्याच्या शेवटी पे लेटर बिल भरल्यानंतर व्याजाची रक्कम त्या ग्राहकाच्या फ्रीचार्ज वॉलेटमध्ये ‘कॅशबॅक’ स्वरूपात पुन्हा जमा होईल.  अशाप्रकारे हे चार्जेस ग्राहकांसाठी ओझे ठरणार नाहीत याची खबरदारी फ्रीचार्ज घेत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading