Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जनजागृती 

पुणे : तंबाखू सेवन करणाऱ्या  रुग्णांमध्ये वेगाने वाढणाऱ्या कर्करोग  या जीवघेण्या  आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी ध्रीती गार्डे या डेंटल सायन्सच्या विद्यार्थिनीने सोशल मीडियाद्वारे  जनजागृती मोहीम सुरु केली आहे.
३१ मे या जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून या विद्यार्थिनीने सोशल मीडिया वरील लेखनाद्वारे तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती दिली आहे.ध्रीती गार्डे ही  भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजच्या बॅचलर ऑफ डेंटल सायन्स(बीडीएस) या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

‘शैक्षणिक आणि सामाजिक जनजागृतीच्या उद्देशाने हा उपक्रम करण्यात येत आहे,मुख कर्करोग,तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी देखील सोप्या भाषेत  माहिती देण्यात येत आहे’,असे ध्रीती गार्डे हिने सांगितले.यापूर्वी म्युकर मायकॉसिसची माहिती यू ट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमधून ध्रीती गार्डे हिने दिलेली आहे. 
‘तंबाखू जर्दा ,खैनी,बिडी ,सिगारेट ,इलेक्ट्रॉनिक सिगारेट ,हुक्का ,गुटखा अशा कोणत्याही माध्यमातून तंबाखू सेवन हे कर्करोगाला निमंत्रण ठरू शकते . म्हणून या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे . मुख कर्करोगाच्या लक्षणांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.  मुख आरोग्याचे नियम पाळले पाहिजेत .तंबाखू व्यसनापासून सुटका करून घेण्यासाठी सरकारच्या http://www.nhp.gov.in/quit-tobacco या संकेतस्थळाची मदत घेता येईल तसेच ०११-२२९०१७०१ या दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देता येईल’ ,असे ध्रीती गार्डे यांनी सांगितले.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading