Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsMAHARASHTRA

बजाज अलायन्झ लाइफतर्फे तौक्ते चक्रीवादळग्रस्त विमाधारकांसाठी क्लेमची प्रक्रिया सुलभ

पुणे, दि. २४:  बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्सने महाराष्ट्र व गुजराजमधे चक्रीवादळाचा फटका बसलेल्या आपल्या ग्राहकांसाठी खास तरतूद केली आहे. कंपनी ग्राहकांचे मृत्यू आणि अपंगत्वाशी संबंधित क्लेम्स प्राधान्याने स्वीकारणार असून ते सेटल करण्यासाठी वेगवान प्रक्रिया तयार करण्यात आली आहे.

क्लेम्सची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बजाज अलियान्झ लाइफने किमान कागदपत्रांची यादी तयार केली असून वारसदारकायदेशीर वारस किंवा विमाधारकाला या कागदपत्रांसह क्लेम दाखल करता येणार आहे.

  1. जन्म आणि मृत्यू नोंदणी कार्यालयाद्वारे वितरित केले जाणारे मृत्यूचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास कंपनी सरकारी हॉस्पिटल किंवा पोलीस किंवा महाराष्ट्र आणि गुजरातच्या सरकारी अधिकाऱ्यांतर्फे विमाधारक व्यक्तीचे नाव प्रमाणित केलेले असल्यासही स्वीकारणार आहे.
  2. वारसा किंवा कायदेशीर वारसाचे केवायसी (ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा), एनईएफटीसाठी बँकेचे तपशील.
  3. मृत/हरवलेल्या विमाधारक व्यक्तीचा फोटो

बजाज अलियान्झ लाइफ विमा योजनेविषयी काही शंका असल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांना कंपनीच्या 18002097272 या क्रमांकावर किंवा पुढील क्रमांकावर संपर्क साधता येईल.

नाव ईमेल आयडी संपर्क
आशिष शर्मा

(मुंबई)

Ashish.Sharma012@bajajallianz.in 8234009672
अमनप्रीत गांधी

( उर्वरित महाराष्ट्र)

amanpreet.gandhi@bajajallianz.in 8427433433
जयद्रथ चंपावत

(गुजरात)

Jayadrathsinh.Champa@bajajallianz.in 9998093367

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading