लॉकडाऊन नियमभंग – पुण्यातील एका हॉटेलला तब्बल १ लाख रुपयांचा दंड
पुणे, दि. २३ – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काही अटि व शर्ती आखून दिलेल्या आहेत. आणि त्याचे पालन करणे सर्वांवर बंधनकारकच आहे. तसेच शनिवार- रविवार पुर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेशही आहे. परंतु शासनाचे नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी भवानी पेठ ए डी कॅम्प चौकातील मिलन हॉटेल चालकाला तब्बल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सदरील कारवाई पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आली आहे. १ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदरील कारवाई भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद, निसार मुजावर व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून केली असल्याची माहिती मिळाली .
