‘यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई – काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकण उद्ध्वस्त झालं. कोकण किनारपट्टीवरील गावांचं अतोनात नुकसान झालं आहे. या नुकसान ग्रस्त भागाचा दौरा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपचे नेते नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, “यालाच म्हणतात ‘lipstick’ दौरा… मुख्यमंत्री… कुठल्याही गावाला भेट नाही… मोजून 10 km आतच… विमानतळावरच आढावा… दौरा संपला!!! ईथे… फडणवीसजींचा 700kms चा झंझावात कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना!!”.
इतकेच नाही तर नितेश राणे यांनी आणखी एक ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यााचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यातील फोटोज पोस्ट करत नितेश राणे यांनी त्याला कॅप्शन दिलं आहे, “आमचा नेता लय पॉवरफुल्ल”.
यालाच म्हणतात “lipstick” दौरा..
— nitesh rane (@NiteshNRane) May 21, 2021
मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..
मोजून 10 km आतच..
विमानतळावरचा आढावा..
दौरा संपला!!!
ईथे..
फडणवीसजीं चा 700kms चा झंझावात..
कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना!!
चक्रीवादळामुळे नुकसानीचे पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर राज्यस्तरावर आढावा घेवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल. चक्रीवादळामुळे ज्या ज्या घटकांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली जाईल. कोळी बांधव, मच्छिमार व्यावसायिक यांच्यासह कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
