बँक ऑफ बडोदाने ‘फिर जीतेंगे’ या गीतासह परत जागवली कोविड- 19 विरोधात लढण्याची आशा
मुंबई – बँक ऑफ बडोदा, या भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने ‘#फिरजीतेंगे’ या हृदयस्पर्शी व्हिडिओसह कोविडच्या दुसऱ्या लाटेत आपण देशाबरोबर ठामपणे उभे आहोत हे दर्शवले आहे. उज्ज्वल क्षितिजाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशा कायम ठेवणं आणि संपूर्ण राष्ट्रानं एकत्र येणं किती महत्त्वाचं आहे हे याचे महत्त्व या व्हिडिओतून दाखवण्यात आले आहे.
या व्हिडिओमधे जगातील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, श्रीकांथ किदाम्बी, गायक जावेद अली आणि ऐश्वर्या मजुमदार, रेडिओ जॉकी कार्तिक आणि अर्चना नागरिकांना एकत्र येऊन या विषाणू विरोधात लढण्याचे आवाहन करतील. हे सेलिब्रेटीज या गाण्यातून योग्य काळजी घेण्याविषयी जागरूकता पसरवतील तसेच लसीकरणाचे महत्त्व पटवून देतील.
या महामारीमुळे सर्वच समीकरणे नव्याने प्रस्थापित झाली असून या अभियानातून सकारात्मक मनस्थिती, अधिक चांगल्या भविष्यासाठी शारीरिक व मानसिक पातळीवरील मजबुती यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
या उपक्रमाविषयी डब्ल्यूएमएस मार्केटिंग, कॅपिटल मार्केट आणि एनआरआय व्यवसाय, बँक ऑफ बडोदाच्या रिटेल लायबिलिटीज विभागाचे मुख्य व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तम म्हणाले, ‘सध्याच्या महामारीच्या काळात समाजातल्या सर्व स्तरातील व्यक्तींनी आशेच्या एकाच भावनेतून एकत्र येणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणं आणि एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे. फिर जितेंगे हे गीत प्रत्येकासाठी आहे आणि ते प्रत्येकाला आपण आतापर्यंत एक देश म्हणून कायम एकजुटीने यशस्वी झालो आहोत याची आठवण करून देत अंतर्गत शक्तीवर ठाम विश्वास ठेवायची प्रेरणा देईल.’
