Saturday, June 13, 2026
PUNE

कोविड संकटात परवेज तांबोळी यांची नि:स्वार्थ सेवा

पुणे – कोरोना महामारीमध्ये देशाची गंभीर परिस्थित बघता दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची कमतरता पडत आहे याचे गांभीर्य लक्षात घेवून कसबा विधानसभा मतदार संघातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी परवेज तांबोळी यांनी कोरोना बाधित रूग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळेपर्यंत रूग्णांच्या घरीच ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. या युवकाने स्वखर्चाने १० ऑक्सिजन सिलेंडर, २ जम्बो सिलेंडर व १ कॉन्संटेटर्स उपलब्ध करून दिले. विशेषत: झोपडपट्टीमधील नागरिकांना व गरज पडल्यास रूग्णालयातही ऑक्सिजन पुरवठा स्वखर्चाने केला.

आजपर्यंत परवेज तांबोळी यांनी कोरोना रूग्णसेवा म्हणून ४० रेमडेसिविर इंजेक्शन, ३० ऑक्सिजन बेड, ६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रभागामध्ये रूग्णांना फ्री रिक्षासेवा दिली. आपपर्यंत जवळपास ७० रूग्णांना प्लाम्झा उपलब्ध करून दिला. विविध हॉस्पिटलमधील कोरोना रूग्णांचे वाढीव बिल कमी करून देण्याचे महत्वाचे काम परवेज तांबोळी यांनी केले आहे. त्याचबरोबर गरजू नागरिकांना व शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना अन्न – धान्य वाटप चालू आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading