कोरोना – राज्यात गुरुवारी २९ हजार ९११ नवीन रुग्ण; ७३० जणांचा मृत्यू
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ६० हजारांपार गेलेला कोरोना रुग्णांचा आकडा आज ३० हजारांच्या खाली आल्याने महाराष्ट्राला जरा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे रुग्ण सापडले असून आज ४७ हजार ३७१ रुग्णांंना घरी सोडण्यात आले आहे. तर, आज ७३० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बरे होण्याचा आकडा 50 लाख 26 हजार 308पोहोचला आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.43% एवढे झाले आहे.
राज्यात आज 738 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.55% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 32 कोटी 15 लाख 4 हजार 275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5497448 (17.9 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2935409 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 3832253 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आज मुंबईत 1425 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे तर 1460 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज 59 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
पुणे शहर अपडेट
- दिवसभरात ९३१ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात १०७६ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १३२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६३१०३.
- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५०४३.
- एकूण मृत्यू -७८८७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४०१७३. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२२६.
