Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने उद्या ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन

पुणे, दि.२०:- देशातील उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक असलेली अप्रेन्टिस योजना योजनेची व्याप्ती स्वरुप व अंमलबजावणी या विषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी अप्रेन्टिस योजनेचे उद्योगजगताला होणारे फायदे या विषयावरील मोफत परिसंवादाचे पुणे व सातारा जिल्ह्यासाठी २१ मे रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

ऑनलाईन होणाऱ्या परिसंवादात यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्सचे संचालक संजय छत्रे व यशस्वी संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन विभागाचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी या मान्यवरांचा या परिसंवादात सहभागी होणार आहे. अधिकाधिक मनुष्यबळ व्यवस्थापकांनी या परिसंवादासाठी नाव नोंदणी करावी. या मोफत होणाऱ्या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी लिंकवर http://tiny.cc/sded_apprenticeship

नावनोंदणी करण्याचे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading