fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज ३४ हजार नवीन रुग्ण; ५९४ मृत्यू

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत ३४ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५९४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत गेल्याकाही दिवसांपासून चढउतार पाहयला मिळत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तर राज्यात आज ५१ हजार ४५७ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.

राज्यात आज ३४ हजार ०३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५४ लाख ६७ हजार ५३७ वर पोहचली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत ४९ लाख ७८ हजार ९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४ लाख ०१ हजार ६९५ अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णाल आणि घरीच्या घरी उपचार सुरु आहेत.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ (१७.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३० लाख ५९ हजार ०९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ५९४ मृत्यूंपैकी ३३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.

पुणे शहर अपडेट्स

  • दिवसभरात ११६४ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात २४०७ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ४८ रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३४८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४,६२,१७२.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५,२३२.
  • एकूण मृत्यू -७,८४३.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४,३९,०९७.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १०,८०६.
  • आजवर झालेल्या नमुन्यांची चाचणी – २३,९२,०९८.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading