Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाकाळात देहविक्री करणाऱ्या महिलांच्या अडचणी वाढल्या- सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांचे प्रतिपादन

पुणे : ज्या देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करतो ते वंचिताच्या पलिकडचे वंचित आहेत, असा अनुभव आम्हाला नेहमीच येत असतो. त्यांना कुठल्याही प्रकारे सामावून घेतले जात नाही. मागील एका वर्षापासून अतिशय कठीण प्रसंगातून या महिला जात आहे. त्यांच्या अडचणी कोरोनामुळे खूप वाढल्या आहेत. एकही रुपयांची कमाई नाही त्यातच स्वतःसोबत मुलांचेही प्रश्न आहेत. त्यांना समाजाकडून मदत मिळाल्यावर दिलासा मिळतो, असे प्रतिपादन सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी यांनी केले

आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने देवदासी महिलांकरीता रेशनचे कोट तसेच जम्मू काश्मिरमधील नागरिकांना कौविडच्या पार्श्वभूमीवर औषधे पाठवण्यात आली. शनिपार जवळील लिंबराज महाराज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. अँड. मोहन मोरे, ज्ञानेश्वर विटोले, अखिल झांजले, अभवराज शिरोळे, सारंग सराफ, उमेश सोनेरी, हेमंत जाधव यावेळी उपस्थित होते. महानंदा पवार आणि ऋषभ सर्जिकल्सचे उपक्रमाला सहकार्य मिळाले.

हेमंत जाधव म्हणाले, कोरोनाकाळात समाजातील सर्वच घटकांवर विकट प्रसंग ओढावला आहे. परंतु एकमेकांना साथ देऊन या कठीण प्रसंगावर मात करता येईल. देहविक्री करणाऱ्या महिला तसेच त्यांच्या मुलांकरीता हे रेशनचे कीट देण्यात आले आहे. समाजातील प्रत्येकानेच आपापल्या परिने शक्य तितकी मदत करावी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading