ऑनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा – स्वराज कोकाटे, अनया बनकर, श्रावणी कटके प्रथम
पुणे : महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेत स्वराज कोकाटे, अनया बनकर, श्रावणी कटके यांनी आपापल्या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या आॅनलाईन उद्घाटन समारंभास वुशू असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंदर सिंग बाजवा, राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, विनोद पाटील, नंदकुमार घोडेले, सोहेल अहमद, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महासचिव सोपान कटके उपस्थित होते.
राष्ट्रीय आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पधेर्तून आशियाई आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पधेर्साठी भारताचा संघ निवडला जाणार असल्याने राज्यस्तरीय वुशू स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत –
सबज्युनियर मुली – ननक्वॉन – अनया बनकर,पुणे (प्रथम), राजनंदिनी जाधव, पुणे (द्वितीय) , ताईजीक्वॉन – अयाती डोळस,पुणे (प्रथम), चॅनक्वान – अयाती डोळस,पुणे (प्रथम), अनया बनकर (द्वितीय), श्रिया सोनावणे, राजनंदिनी जाधव, पुणे (तृतीय)
सबज्युनियर मुले – चॅनक्वान – अर्जुन देशपांडे, पुणे (प्रथम), आर्यन रेवणकर, मुंबई (द्वितीय), रुद्रवीर इखे, पुणे, संस्कार परिहार, वर्धा (तृतीय) – ननक्वॉन – रुद्रवीर इखे (प्रथम)
ज्युनियर मुले – ननक्वॉन-स्वराज कोकाटे, पुणे (प्रथम),श्रीकांत कदम, कोल्हापूर (द्वितीय), भूषण पाटील,औरंगाबाद, योगेश सोळुंके, औरंगाबाद (तृतीय) – ताईजीक्वॉन – स्वयम कटके, पुणे (प्रथम), स्वराज कोकाटे, पुणे (द्वितीय), ओंकार मोडक,पुणे, रोनित सिनकर, मुबंई (तृतीय)
सिनियर मुली – ताईजीक्वॉन -श्रावणी कटके, (प्रथम), कल्याणी जोशी (द्वितीय), मिताली वाणी, तृप्ती चांदवडकर (तृतीय) – सर्व पुणे.
सिंगल शॉर्ट वेपन मुली – श्रावणी कटके, (प्रथम), मिताली वाणी (द्वितीय), खुशी तेलकर, कल्याणी जोशी (तृतीय) – सर्व पुणे.
सिनियर मुले – अथर्व मोडक, पुणे (प्रथम), राजमल्हार व्हटकर, पुणे, मारोती ढेम्बरे (द्वितीय), समाधान शिंदे, योगेश सोळुंके, औरंगाबाद (तृतीय)
सिंगल शॉर्ट वेपन मुले – अथर्व मोडक, पुणे (प्रथम), निखिल पांढरे, सातारा (द्वितीय ), समाधान शिंदे, औरंगाबाद (तृतीय)

Always outstanding performance