एक उमदा नेता कॉंग्रेस पक्षाने गमावला ! – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : खासदार राजीव सातव यांच्या निधनाने एक उमदा नेता गमावला अशा शब्दात माजी आमदार अणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी श्रध्दांजली वाहिली.
काँग्रेसचे नेते राजीव सातव आणि त्यांचे घराणे काँग्रेसनिष्ठ घराण्यांपैकी एक.युवक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच निष्ठा आणि अभ्यासू वृत्तीने राष्ट्रीय राजकारणापर्यंत त्यांनी मजल मारली. मोठमोठी पदे मिळूनही ते कायम नम्र राहिले. त्यांच्या स्वभावात साधेपणा होता. विनम्रता होती.
महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी राजीव सातव यांचे दिल्लीतील घर हे हक्काचे घर होते. माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध होते. ते मला दादा म्हणूनच हाक मारत असत, त्यामुळे त्यातून आमचे भावनिक नाते जुळून आले.
