fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

‘कोवीड साथीनंतरच्या काळातील मनुष्यबळ व्यवस्थापन’ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेस प्रतिसाद

पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )आयोजित  ‘कोवीड साथीनंतरच्या काळातील मनुष्यबळ व्यवस्थापन’ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेस  शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.’रुबीकॉन’ च्या मुख्य कार्यसंचालन  अधिकारी धन्या नारायणन, एनएलसी  लिमिटेड चे उप व्यवस्थापक शुल्गाना सरकार या तज्ञांनीं मार्गदर्शन केले.

भारती विद्यापीठाच्या  व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि  ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते.१४ मे २०२१ रोजी ही ऑनलाईन राष्ट्रीय परिषद पार पडली.संशोधक,प्राध्यापक तसेच एमबीए आणि बीबीए अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभाग घेतला.

शुल्गाना सरकार म्हणाले ,’ आरोग्य जपणे, ज्ञान -तंत्रज्ञान अद्ययावत ठेवणे आणि कौशल्ये वृध्दी करीत राहिल्यानेच उद्योगाना कोविडमध्ये आणि नंतरच्या काळात प्रगती करणे शक्य होईल. माहिती -तंत्रज्ञान सेवांचा प्रभावी उपयोग उपयुक्त ठरेल.’धन्या नारायणन  म्हणाल्या,’उद्योग क्षेत्र आव्हानांना तोंड देत असून या क्षेत्रात येणाऱ्या व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी तेथे काही मिळविण्याची भावना ठेवून येण्यापेक्षा योगदान देण्याची भावना ठेवून यावे ‘. ‘आताच्या जगात आव्हानांना तोंड देण्यासाठी बुद्धीची तयारी असून भागत नाही तर मनाची तयारी असणे अधिक महत्वाचे ठरते. उद्योग क्षेत्रात मनुष्य बळ व्यवस्थापकाचे काम महत्वाचे आहे , त्यासाठी   विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी आयएमईडी मध्ये करून घेतली जात असून नव्या आव्हानांना तोंड देणारे नेतृत्व येथील विद्यार्थ्यांमधून घडेल’असा आशावाद डॉ सचिन वेर्णेकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
डॉ प्रवीण माने ,डॉ हेमा मिरजी ,डॉ सोनाली खुर्जेकर ,डॉ सचिन आयरेकर यांनी संयोजन केले . सर्व सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली . 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading