Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

भेंडवळची भविष्यवाणी- शेतकऱ्यांना दिलासा, पण कोरोना संकट कायम

बुलडाणा – विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात असलेल्या भेंडवळच्या भविष्यवणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अखेर आज ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. भेंडवळच्या भविष्यवणीनुसार राज्यात यंदा चांगला पाऊस पडणार आहे. मात्र कोरोनाचे संकट यावर्षीही कायम राहणार आहे.

भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडेल. ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही देशावर रोगराईचे संकट मोठ्याप्रमाणावर असून देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे.

भेंडवळची भविष्यवाणी काय सांगते

– जून महिन्यात कमी तर जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल
– ऑगस्ट महिन्यात साधारण तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी होईल
– विशेष म्हणजे अवकाळी पावसातून आगामी वर्षात बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
यंदा कापूस, ज्वारी, मूग अशी पीक चांगल्या प्रमाणात येणार असून भाव ही चांगला राहणार आहे.
– तांदूळ, वाटाणा, जवस, गहू यावर्षी चांगले येईल पण या पिकांना भाव मिळणार नाही.
देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

– यावर्षीही रोगराई जास्त प्रमाणात असणार
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

– देशाच्या प्रधानावर ही संकट आहे असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
– देशाच्या सरंक्षण खात्यावर दबाव, ताण राहणार आहे.
– देशात घुसखोरीचा प्रभाव जास्त राहील.
– पृथ्वीवर मोठं संकट येईल तर संपूर्ण जगात आर्थिक टंचाई भासेल.
– देशाच्या राजाची गादी कायम राहणार
राजाला अनेक अडचणींचा, तणावाचा सामना करावा लागेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading