Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

‘रयतेची काळजी घेणाऱ्या…’ आधुनिक छत्रपती संभाजी महाराजांची गरज – संतोष शिंदे

पुणे – छत्रपतींच्या काळात रयत तडफडून उपचाराअभावी मरत नव्हती. प्रत्येक मावळा शिवाजी-संभाजी म्हणून स्वतः लढत होता. महामारीत लोकांना नदीमध्ये गुपचूप पुरले नसते. गडकोटांच्या महाराष्ट्रात सह्याद्री सुद्धा जनता सुखात आनंदात नांदत होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक माणसाला आपले माणून प्रत्येक माणसाची जातीने काळजी घेऊन लक्ष देत असत. रयतेवर जर कोण अन्याय करत असेल तर छत्रपती संभाजी महाराज अशा नराधमांना प्रत्यक्ष जागेवर कठोर शासन करत असेल. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचे सुद्धा संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. त्या शिवकाळ आणि अर्थात छत्रपतीच्या स्वराज्याची आज महाराष्ट्राला नव्हे देशाला गरज आहे.

आजचे राज्यकर्ते जनतेला तडफडून मारत आहेत इतकी निर्दयी राज्यव्यवस्था आज आपल्या देशात निर्माण झाली आहे. आज जर छत्रपती संभाजी महाराज असते तर या सत्ताधाऱ्यांना (मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान) टकमक टोकावरून कडेलोट केला असता आणि जनतेला सर्व सुख सोई पुरवल्या असत्या… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज धर्मसत्ता, अर्थसत्ता, राजसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता व न्याय सत्ता ह्या खिळखीळ्या करून ठेवल्या आहेत. त्या पूर्ववत करण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी संभाजी यांचा काळ आठवावा लागेल. इतिहासाची प्रेरणा घेऊन परत लोकशाहीची सामाजिक क्रांती करावी लागेल. हीच खरी संभाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन असेल…

•• घराघरात संभाजी महाराज जयंती साजरी… ••

कोरोनाचा संकट काळ असल्यामुळे घराबाहेर पडून गर्दी न करता स्वतःवर आणि कुटुंबावर संकट न आणता घरात राहूनच सरकारच्या सर्व नियमाचे पालन करून संभाजी महाराज जयंती घरामध्येच साजरी करण्यात आली.

यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, शिवाजी शिंदे, सई शिंदे व शालिनी शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading