Saturday, May 30, 2026
BusinessNATIONALTOP NEWS

सीरम इन्स्टिटयूट ठरली सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी; २२५१ कोटींचा निव्वळ नफा

नवी दिल्ली – देशात २०१९ – २० या आर्थिक वर्षात सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपनींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ‘कोव्हिशिल्ड’ ही कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचा सामावेश आहे. कॉर्परेट कंपन्याच्या व्यवहारासंदर्भात माहिती ठेवणाऱ्या कॅपिटलाइनने प्रकाशित केलेल्या नव्या अहवालानुसार सन २०१९-२० मध्ये भारतातील ४१८ भारतीय कंपन्यांनी पाच हजार कोटींहून अधिक रक्कमेचा एकूण व्यापार केलाय. यामध्येही  ‘कोव्हिशिल्ड’ बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला आणि ‘कोव्हॅक्सिन’ बनवणाऱ्या भारत बायोटेकचा सामावेश आहे. लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार सीरमने पाच हजार ४४६ कोटींच्या विक्रीच्या मोबदल्यात दोन हजार २५१ कोटींचा निव्वळ नफा कमवला आहे. हा नफा नेट मार्जिनच्या ४१.३ टक्के इतका आहे.

सीरम कंपनीच्या नफ्याची टक्केवारी अधिक असण्यामागील मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणज कंपनी भारतामध्ये लसीची निर्मिती करत असून जगामध्ये सध्या सर्वाधिक लसीची गरज भारतालाच आहे. त्यामुळेच जगातील सर्वात मोठी औषध निर्मिती करणारी सीरम ही सर्वाधिक नफा कमवणारी कंपनी ठरलीय. एप्रिल २०२० मध्ये पहिल्यांदा कंपनीने ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकासोबत एकत्र येत कोव्हिशिल्डची निर्मिती केली होती.

सीरमची मालकी असणाऱ्या पुनावाला समुहाने हॉर्स ब्रीडींग, बांधकाम व्यवसाय, अर्थसहाय्य, हवाई श्रेत्र यामध्येही गुंतवणूक केलीय. २००८-०९ आणि २०१५-१६ दरम्यान सीरमचा महसूल २३ टक्कांनी वाढून वार्षिक स्तरावर ४ हजार ६३० कोटींवर पोहचला. तर निव्वळ नफ्यात २८ टक्के वाढ होत तो १२ हजार १९१ कोटींवर पोहचला. मात्र सन २०१५-१६ ते २०१९-२० दरम्यान कंपनीच्या महसुलामध्ये चार टक्क्यांनी घट झाली आणि निव्वळ नफाही या वर्षांमध्ये कायम राहिला.
भारतामध्ये १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८५ कोटी नागरिकांना लसी देण्यासाठी १७० कोटी लसींची गरज भासणार आहे. एका खासगी कंपनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या अदर पुनावाला यांनी कंपनीला तीन हजार कोटींची गरज असून या पैशांमधून दर महिन्याला १० कोटी लसींची निर्मिती करता येईल असं सांगितलं आहे. हा पैसा बँकांकडून किंवा सरकारकडून मिळाला तरी हरकत नाही असं पुनावाला म्हणालेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading