Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज ४२ हजार ५८२ नवीन रुग्ण; ८५० जणांचा मृत्यू

मुंबई – राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात ४२ हजार ५८२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्याचवेळी ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज ८५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यांची वाढती संख्या चिंताजनक ठरत आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. राज्यात आज ५४ हजार ५३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख ५४ हजार ७३१ इतकी झाली आहे. परंतु आज राज्यातील रुग्ण बरे होण्याचा प्रमाणात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ३३ हजार २९४ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०३,५१,३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,६९,२९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,०२,६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत आज होम क्वारंटाईन रुग्णसंख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले.

आज नोंद झालेल्या एकूण ८५० मृत्यूंपैकी ४०९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८१ मृत्यू, ठाणे- ५६, पुणे- ४०, नागपूर- २९, बीड- २०, गडचिरोली- १९, रत्नागिरी- १६, नंदूरबार- १५, सोलापूर- १५, जळगाव- १४, बुलढाणा- ११, नाशिक- ८, औरंगाबाद- ५, चंद्रपूर- ४, जालना- ४, रायगड- ४, सातारा- ४, सांगली- ३, वाशिम- ३, भंडारा- २, लातूर- २, नांदेड- २, उस्मानाबाद- २, धुळे- १, परभणी- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत.

पुणे शहर अपडेट्स

  • दिवसभरात २३९३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४१३५ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७५ रुग्णांचा मृत्यू. २५ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३७२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५४४५७.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५२२२.
  • एकूण मृत्यू -७५६३.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४२१६७२.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२७३८.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading