Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

युवक काँग्रेसच्या वतीने रिक्षा चालकांना ‘रेशनिंग किट’चे वाटप

पुणे – पहिली, मग दुसरी, मग तिसरी ..लाटांवर लाटा येतच चालल्या आहेत. कोरोना महामारीचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि त्यात सामान्य माणूस दबून जात आहे. अनेकांचे व्यवसाय, नोकरी आणि रोजगार बुडाले आहेत आणि उपासमारीची वेळही कित्तेकांवर आली आहे, अशा अडचणीच्या काळात माणुसकी आणि आपले समाजाप्रती कर्तव्य याची जाण ठेवत पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने वडगावशेरी विधानसभेत मोठ्या संख्येने रिक्षाचालक बांधवांना “रेशनिंग किट” चे वाटप करण्यात आले.

 गहू, तांदूळ, डाळी, तेल, साखर व अन्य गरजेच्या वस्तू यात समाविष्ट करून रोजगार बंद असणाऱ्या या बांधवांना उदरनिर्वाहासाठी एक छोटा दिलासा देण्याचा हा प्रयत्न. माजी गृहमंत्री रमेश बागवे, विद्यमान आमदार सुनील आण्णा टिंगरे, मोहन जोशी, अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष आमीर शेख, येरवडा पोस्टचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, वडगाव शेरी ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, बाबा नायडू, दिलीप देवकर, संतोष पाटोळे, वाहिद नीलगर, प्रसाद वाघमारे, अभिजीत साळवे, शानू चलवादी, किरण पाटोळे, निशांत शिरसाट, राजू लोखंडे, अक्षय गायकवाड, सुमित लांडगे तसेच विविध प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत हा कार्यक्रम संपन्न झाला. माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने व नवनिर्वाचित कार्याध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली या उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  “समाजातील प्रत्येक युवकाने जर वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजातल्या सर्व गरजू व अडचणीतल्या घटकांना मदतीचा हात पुढे करून आपले सुजाण नागरिक असल्याचे कर्तव्य पार पाडले तर नक्कीच कोणीही अडचणीत राहणार नाही आणि या कठीण वेळेवर सहजपणे मात करून आपल्याला पुढे जाता येईल..!… असे मत यावेळी राहुल शिरसाट यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading