Saturday, June 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत, जाणून घ्या नवीन नियमावली

मुंबई, दि. 13 : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हे 15 मे पर्यंत कायम होते परंतु आता हे निर्बंध 1 जूनपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची नियामवली जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी 31 मे पर्यंत कठोर निर्बंध लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता, मात्र याता त्यात आणखी एका दिवसाची भर पडली आहे. 

या काळात दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे, तसंच घरपोच सेवा विक्री यासाठीही परवानगी कायम आहे. त्याचबरोबर इतर राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी 48 तास आधी कोरोनाची आरटीपीसीआरटी टेस्ट गरजेची आहे. परराज्यातून माल वाहतूक करणारे गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल. त्यासाठी देखील आरटीपीसीआर टेस्ट गरजेची असणार आहे.

अशी आहे नवीन नियमावली (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत)

१) किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11

३) भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11

4) फळे विक्री- सकाळी 7 ते 11

5)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11

6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11

7) पशूखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11

8)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11

9)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11

10)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने-सकाळी 7 ते 11

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading