Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Breaking- राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा आमदार आण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरी, दि. १२: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना आज दुपारी एक वाजता चिंचवड स्टेशनजवळ घडली. दरम्यान, या गोळीबारातून आमदार बनसोडे सुखरूप बचावले आहेत.  

मिळालेल्या प्रार्थमिक माहितीनुसार, तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने बनसोडे यांच्यावर पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या होत्या. अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलीस तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading