तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांना कोरोनाची लस, जाणून घ्या कसे
पुणे, दि. १२ – करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगितले जात आहे. यांची दखल घेत लाहाणग्यांना लस देता येईल का? यावर संशोधन केले जात आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी लहानमुलांना देखील कोरोनाची लस मिळेल, अशी अपेक्षा आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लांटेचा सर्वाधिक फटका हा तरूणांना बसला आहे, तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना यांचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संभाव्य धोक्याची पूर्व तयारी म्हणून भारत बायोटेक च्या कोव्हॅक्सिंन या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणी सुरू करण्यात येत आहे. सब्जेक्ट एक्स्पर्ट कामितीने (एसईसी) या चाचणीची परवानगी दिली आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही दिल्ली व पटणा येथील एम्स रुग्णालय व नागपूर येथील एका रुग्णालयात केल्या जाणार आहेत. कोव्हॅक्सिंन ही लस ८१ टक्के प्रभावी असून ती लहान मुलांवर देखील प्रभावी ठरेल, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.
दरम्यान, अमेरिकेने १२ वर्षा वरील मुलांना “फायझर”ची लस देण्यास मान्यता दिली असून १३ मे पासून या लासिकरणाची सुरूवात होणार आहे.
